उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील ३५ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ' जय महाराष्ट्र '

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये जाहीररीत्या पक्षप्रवेश केला आहे.
त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगला धक्का बसलेला आहे.
यामध्ये माजी नगरसेवक आणि शिवसेना आणि युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यात विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत राजीनामा सादर केला आहे.
हे सर्व पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक स्थानिक नेते शिवसेना संजय गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मराठवाड्यात पक्षात मोठी गळती लागल्याने पाहायला मिळत आहे.
काही दिवसापूर्वी संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घडले यांनी शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केला. नुकताच पक्षाचे मराठवाडा विभाग सचिव अशोक पटवर्धन यांनीही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला.
काही दिवसापूर्वीच संभाजीनगर मध्ये माझी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील गटबाजी विरोधात पक्षप्रमुखांकडे पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली होती त्यानंतर यापुढे कोणीही शिवसेना सोडणार नाही असा दावा सुद्धा केला होता.
पण आज ३५ पदाधिकाऱ्यांच्या राजीनामामुळे हा दावा पोकळ ठरला महानगरपालिका निवडणुकीपूर्वी नेते पदाधिकाऱ्यांनी पक्षाला केलेला जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणार नक्की असे दिसून येतं आहे.