प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांना नामदेव ढसाळ पुरस्कार
डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अलीकडेच दुबई येथे प्रकाशित झालेल्या नवी लिपी कवितासंग्रहासनामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर

द फ्रेम न्यूज
नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजकिरण गव्हाणे
नांदेड : स्वामी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठातील माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या अलीकडेच दुबई येथे प्रकाशित झालेल्या नवी लिपी कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा यंदाचा नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला. नवी लिपी या कवितासंग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची कलात्मक नोंद घेणाऱ्या व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता समाविष्ट आहेत डॉ. राजेंद्र गोणारकर यांचा हा दुसरा कवितासंग्रह असून त्यांची निळे आकाश सूर्यपक्षी मराठवाड्यातील आंबेडकरी प्रबोधन पर्व दलित पॅंथर, सम्यक आकलन आदि तेरा पुस्तके प्रकाशित आहेत. 30 मार्च रोजी नागपूर येथे विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक कुमार खोब्रागडे व सरचिटनीस डॉ. प्रकाश करमाडकर यांनी कळवले आहे.