औरंगाबाद विमानतळाच्या प्रवेश द्वार समोर तथागत भगवान बुद्धांच्या मुर्तींचे उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न..!
" ही मूर्ती केवळ एक भव्य शिल्प नाही, तर समृद्ध भारतीय संस्कृतीच्या प्रतीकाचे रूप आहे.- मा.मंत्री अतूल सावे

द फ्रेम न्यूज दि २८/०३/२५
छत्रपती संभाजीनगर : आज चिकलठाणा येथील औरंगाबाद विमानतळ येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या १५ फुट उंच भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास उपस्थित पूज्यनीय भंन्ते भदंत बोधीपालो महाथेरोजी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री मा. श्री. संजय शिरसाट, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत, यांची तसेच इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुलजी सावे साहेब यांची या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास बहुसंख्येने उपासक आणि उपासिका यांचे उपस्थिती होती.” ही मूर्ती केवळ एक भव्य शिल्प नाही, तर समृद्ध भारतीय संस्कृतीच्या प्रतीकाचे रूप आहे. ती इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस शांती, सहिष्णुता आणि मानवतेचे महत्त्व सांगते. त्याचप्रमाणे, पर्यटनाच्या दृष्टीनेही हे एक महत्त्वाचे ठिकाण बनवले जाईल, जे नंतर लोकांना शांति आणि आध्यात्मिक अनुभव प्रदान करेल. “– श्री. अतूल सावे (मंत्री इतर मागास बहुजन कल्याण दुधविकास अपरंपारिक ऊर्जा विभाग महाराष्ट्र शासन)
तसेच सोहळ्या निमित्त BIMATA संस्थेचे सन्माननीय सचिव उपा. रविकुमार आर. वासाटे तसेच बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स व ट्रेडर्स असोसिएशन चे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.