डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ; उपराष्ट्रपतीचीं उपस्थिती
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती तथा महाराष्ट्रराज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन असतील.या समारंभ बाबत पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिली. ते म्हणाले दीक्षांत समारंभ शनिवारी २२ फेब्रुवारी दुपारी ३:२० मिनिटांनी विद्यापीठ नाटकगृहात होणार आहे. या समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच दीक्षांत समारंभात ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३ व मार्च एप्रिल २०२४ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहेत.