देवगिरी शासकीय आयटीआय मध्ये नवनियुक्त शिल्प निदेशकांचे १५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने शासकीय आयटीआय मधील नवनियुक्त शिल्पनिदेशकांचे १५ दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औ प्र संस्था, औंध पुणे येथे प्रत्यक्षपणे तर देवगिरी शासकीय औ प्र संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे आभासी पद्धतीने करण्यात आले. प्रसंगी औंध आयटीआय मध्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त नितीन पाटील, टाटा स्ट्राईव्हचे सीओओ अमेय वंजारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयच्या संचालिका माधवी सरदेशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध विभागातील प्रशितन आणि वाताणूकुलीकरण तंत्रज्ञ या व्यवसायातील 23 प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ ते ३ मार्च २०२५ या कालावधीत तांत्रिक प्रशिक्षण देवगिरी आयटीमध्ये देण्यात येणार आहे. प्रसंगी देवगिरी आयटीआय मध्ये विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, मसीआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, आयटीआयचे उपसंचालक प्रदीप दुर्गे, उपप्राचार्य सत्यभूषण गोसावी, उपप्राचार्य रंगराव बुलबुले, प्रादेशिक कार्यालयाचे दिनेश निकम, मंत्र्यांचे संपर्क प्रतिनिधी योगेश जोशी, आयसीआयसीआय फाउंडेशनचे श्रीकांत काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कदम तर प्रदर्शन उपप्राचार्य दिलीप वानखेडे यांनी केले.