छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर..!

भारतीय संविधानाचा विजय असो, जयभीम जयभारत, अशा अनेक घोषणां देऊन अक्षरश जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले.

द फ्रेम न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील महत्वपूर्ण क्रांती चौक, शिल्लेखाना चौक, पैठण गेट, भडगल गेट, विद्यापीठ गेट, आणि गुलमंडीवर उसळला भीमसागर तसेच क्रांती चौक ते सिटी चौक पर्यंत अबाल वृद्ध भीमसैनिक कांची तुफान गर्दी पाहायला मिळाली त्यातही महिलाचा सहभाग आवर्जून होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जयभीम जयभारत, अशा अनेक घोषणां देऊन अक्षरश जयघोषाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते.

Oplus_131072

जिकडे तिकडे बाबासाहेबांचे बॅनर्स, पोस्टर्स व मिरवणुकीत सजीव – निर्जीव देखावे सुद्धा सादर करण्यात आले होते. लेझीम पथके आणि ढोल ताशे, पारंपारिक वेशभूषा आणि देखावे सादर करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात सुद्धा बाबासाहेबांचे भव्य पुतळे उभारण्यात आले होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले  राजर्षी शाहू यांचे सुद्धा पुतळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलें.

कडक उन्हाची परवा न करता सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शहरातील प्रत्येक चौकात डॉ. ‌बाबासाहेब आंबेडकर यांचें अनुयायी भर उन्हात बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता एकत्रित जमा झाले होते. तसेच विविध पक्ष संघटनांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.तसेच विविध पक्ष, संघटनांकडून मिरवणूक सहभागी झालेल्या अनुयायीं करीता अल्पोहार, पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.

शहरातील प्रत्येक गल्लीबोळातून मिरवणूक शहरातील प्रमुख चौकांमध्ये सामील होऊन लेझीम, ढोल, ताशे, पथके आणि नृत्य सादर केले. भीमसैनिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने बाबासाहेबांना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button