जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ.विजय घोगरे यांचा भीमराव चिलगावकर यांच्याकडून सेवागौरव सत्कार..!
जलसंपदा विभागात ३३ वर्षाच्या सेवेनंतर मुख्य अभियंता डॉ.विजयकुमार घोगरे निवृत्त..!

फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : जलसंपदा विभागाच्या ३३ वर्षाच्या सेवेनंतर मुख्य अभियंता डॉ.विजयकुमार घोगरे निवृत्त झाले.मराठा सेवा संघ व जलसंपदा प्रादेशिक विभाग संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घोगरे यांचा सपत्नीक सेवागौरव करण्यात आला.जलसंपदा विभागाचे अधिकारी व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.संभाजीनगर येथील रुक्मिणी सभागृहात नुकताच हा समारंभ पार पडला.

याप्रसंगी मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे,आमदार सुरेश धस,आमदार तानाजी मुटकुळे,मा.आमदार रेखाताई खेडेकर,एमजीएम विद्यापीठाचे कुलपती,अंकुशराव कदम,सौ.अनुराधा कदम, जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड, निवृत्त जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख,मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रशेखर शिखरे, बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व व्रुत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर,मराठा सेवासंघाचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे,सौरभ खेडेकर,जिजाऊ ब्रिगेडच्या सिमाताई बोके, बहुजन संग्रामच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव तृप्ती जगताप, बहुजन संग्राम संघटनेचे स़ंभाजीनगरचे जिल्हा संघटक कॅप्टन दीपक घाटे,भीमराव चिलगावकर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन संग्राम व वृत्तदर्शन मीडियाची सर्व टीम,जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता व व्यवस्थापकीय संचालक मा.कुशिरे,पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ,विजय घोगरे यांचे जलसंपदा विभागाचे गुरु व्हि.डी.पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा.अधीक्षक अभियंता संजय सोनवणे,जलसंपदा मनोर जि.पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील तसेच नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ, डी.एस.काटे, डॉ.शिवानंद भानुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाहिर समाधान इंगळे व अमरजित बाहेती यांनी महापुरुषावरील व विजय घोगरे यांच्या जिवनकार्यावरील पोवाडे सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर शिखरे यांनी केले.तर सूत्र संचालन संजय सराटे यांनी केले.या प्रसंगी मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, पत्रकार, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.