राज्यात १ एप्रिल पासून वाहनांना " फास्ट-टॅग " अनिवार्य
" वाहनांना फास्ट-टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल "

” फास्ट-टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल “

मुंबई : महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल पासून सर्वच वाहनांना टोल साठी फास्टट्रॅक बंधनकारक, करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. ज्या वाहनांना फास्टटॅग नसेल तर त्या वाहनांना भरावा लागेल दुप्पट टोल.सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्या करिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कारण केंद्र सरकारच्या धोरणामधील फास्टटॅग नसलेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर दुप्पट टोल आकारला जात असे. त्यामुळे राज्य सरकारचा राज्य सरकारच्या धोरणात बदल करण्यात आला असून फास्टटॅग च्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास त्यामध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे.त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांना टोल भरण्याकरिता रांगा लागत होत्या . त्यामुळे वाहनांचा टोलनाक्यावर खोळंबा कमी होणार आहे. त्यामुळे इंधनाची सुद्धा बचत होईल.