संजय शिरसाठ यांची संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती
दोन वेळा पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होते; पालकमंत्री आपणच होणार,असा विश्वास होता

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी संजय शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीनगर शहरातील औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाठ यांनी चौथा विजय मिळवून ते आमदार झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सामाजिक न्याय मंत्री पदही मिळाले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. जाहीर झालेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजप आणि शिवसेनेकडून दावा केला जात होता कारण ” मागील विधानसभेच्या दोन टर्ममध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे होते.” ” त्यामुळे पालक मंत्री पद आम्हालाच मिळणार ” असा विश्वास बाळगून मागील दिवसात संजय शिरसाठ यांनी वक्तव्य केलं होतं. तसेच ” जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी मुळासकट उखडून फेकून ” देऊ असा ही दावा त्यांनी केला होता. अखेर संजय शिरसाठ यांनी केलेल्या दावा खरा करून दाखविलाच, त्यांची छत्रपती संभाजी नगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.