एका तेजाची तेजाशी होणारी भेट नेत्र दिपक सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी
चैत्यगृहात अद्भुत दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील दहाव्या क्रमांकाच्या लेणी तभगवान बुद्धांच्या मुखावर तेजस्वी किरणोत्सव; जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील चैत्यगृहात अद्भुत दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी केली होती. हा दुर्मिळ क्षण पाहण्याकरिता पर्यटक व इतिहास प्रेमींची चैत्यगृहासमोर अलोट गर्दी झाली होती. स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणी मध्ये एकूण ३४ लेण्या आहेत यातील दहाव्या क्रमांकाची भगवान बुद्धांचे लेणी ही चैत्य गृहात आहे. या लेणीत प्रवेश केल्या वर भगवान बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात वर्षातून तारीख १०,११ व १२ मार्चला किरणोत्सव होऊन भगवान बुद्धांची प्रतिमा या किरणोत्सवाने उजळून निघते ‘एका तेजाची तेजाशी भेट’ होणाऱ्या हा क्षण पाहण्याकरिता देशातील इतरही राज्यातील आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातून पर्यटक या दिवशी लेणीला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात. हा क्षण पर्यटकांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करून घेण्याकरिता अलोट गर्दी केली होती.