'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळने विजतेपद पटकाविले.
राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल "- अजितदादा पवार

द फ्रेम न्यूज
अहिल्यानगर : ६७ व्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रकेसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. विजेता पृथ्वीराज याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. “राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल “, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, , माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुण जगताप, पद्मश्री पोपट पवार, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.