ताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending
आमदार रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष-प्रवेश

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष-प्रवेश केला. आणि आपल्या हाती धनुष्यबाण घेतला. अनेक दिवसांपासून धंगेकर हे काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरु होती. पण अखेर सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची पत्रकार परिषद घेत अधिकृत घोषणा केली.