वाल्मिक कराड बद्दल अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
जो कोणीही दोषी असेल त्याचे धागेदोरे चौकशीत मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अनेक दिवसांच्या मागणीनंतर अखेर खंडणी आणि देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ” दिवंगत संतोष देशमुख यांचं कुटुंब मग त्यात त्यांची मुलगी ,पत्नी किंवा मग भाऊ असेल हे तपास अधिकाऱ्यांना भेटत आहे.”
“तपासात पुढे काय होतंय की नाही,याबाबत त्यांचं कुटुंब चिंतेत आहे. वास्तविक पोलिस यंत्रणा त्यांचं काम करत आहे,सीआयडी,एसआयटीमार्फत अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहे.न्यायाधीशांच्या मार्फतही या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.”
“याबाबत स्वत:मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे.आम्ही सगळ्यांनी याप्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली आहे, जो कोणी माणूस दोषी असतील, त्यांना अजिबातच थारा देणार नाही.”
” ही निर्घृण हत्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुणीही खपवून घेणार नाही. हा महाराष्ट आहे. त्यामुळे कोणीही दोषी असेल त्याचे धागेदोरे चौकशीत मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिला.”
” अजित पवार म्हणाले, ही घटना अतिशय निर्घृण आहे.अशा घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही. यात कोणीही मग तो सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा असेल.किंवा कुणी त्रयस्थ असेल ज्याचा राजकारणाशी संबंध असेल वा नसेल,त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही. कुणाचीही गय केली जाणार नाही.मग त्याचे कुणासोबतही संबंध असले तरी त्याला सोडायचं नाही असं एकनाथ शिंदे यांनीही याविषयी सातारा येथे बोलले आहेत.”
” जे एसपी पाठवलेत ते अतिशय कडक आहे.तुम्ही कुणालाही विचारा,ते कडक आहेत की नाही.त्यांना आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तिथं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिलं आहे,”असंही अजित पवारांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितलं