क्राईमताज्या बातम्यामहायुतीराजकीय
वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

द फ्रेम न्यूज
बीड : आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज वाल्मीक कराडची SIT कोठडी संपली.त्यानुसार ५ फेब्रुवारी पर्यंत आता न्यायालयीन कोठडी कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे मकोकाअंतर्गातील या आधी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. कोर्टात आरोपींचे वकील अशोक कवडे हजर होते. तर सरकार तर्फे सरकारी वकिल बाळासाहेब कोल्हे कोर्टात हजर होते.