गुटखा विक्री करणाऱ्या होलसेल डिलर यांच्यावर कारवाई करा - महाराष्ट्र वाहतूक सेना
गुटखा विक्री करणाऱ्या होलसेल वर टेल डीलर यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत.

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या होलसेल वर टेल डीलर यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत.आज छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र वाहतूक सेना उ.बा.ठा. गटातर्फे निवेदन देण्यात आले.येथे गुटखा विक्री रास रोज पणे करण्यात येत आहे बऱ्याच वेळा गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी कार्यवाही धाडी टाकण्यात येते पण छोटे मोठे दुकानदार टपरी चालक यांनाच लक्ष करून गुन्हे दाखल करण्यात येतात परंतु मोठे व्यावसायिक होलसेलर किंवा डीलर यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. यामुळे लहान लहान व्यापाऱ्यांमध्ये जनतेमध्ये रोष व शंका निर्माण होत आहे. तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचा असं म्हणणं आहे की मोठे डीलर मोठे होलसेलर यांना कोणाच्या आशीर्वादाने वरदहस्थामुळे सूट देण्यात येत आहे. भविष्यकाळात लोकशाही मार्गाने गुटखा विरोधात जन आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील असे महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष सरवर कॅप्टन जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे, जिल्हा महासचिव अमजद खान, जिल्हा कोषाध्यक्ष दत्ता नागरे,यांनी निवेदन दिले आहे.