" मुलगाच व्हावा, तो वारसा चालवेल " मेगा स्टार चिरंजीवी यांचे वादग्रस्त विधान

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतले मेगा स्टार असलेले चिरंजीवी यांच्या त्या वक्तव्यामुळे सध्या ते चर्चेत आलेले आहेत. हैदराबाद येथे चित्रपट कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेते चिरंजीवी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चौफेअर टीका होताना दिसत आहे. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याकरिता नातवाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले पुढे ते असे म्हणाले की “जेव्हा मी घरी असतो तेव्हा मला असे वाटते की; मी महिलांच्या वसतीगृहातील वॉर्डन असल्या सारखं मला वाटत .आशा आहे की राम चरणला यावेळेस एक मुलगा असेल आणि तो वारसा पुढे नेईल” “मला भीती वाटते की, त्याला पुन्हा मुलगी होईल पण त्याला सुंदर मुली आहेत” त्यांनी हे वक्तव्य ब्रम्हा आनंदमच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या कार्यक्रमात केल्यामुळे चर्चेत आलेल आहे. त्यांचं हे वक्तव्य मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव मानल्या जात असल्याचीही चर्चा सुरू आहे.