छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामनोरंजन
Trending

'जेलर-२' चा टीझर प्रदर्शित; पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन मध्ये सुपरस्टार रजनीकांत

वयाच्या ७४ व्या वर्षीही पडद्यावर दमदार अ‍ॅक्शन दाखवताना दिसत आहेत

साऊथ इंडस्ट्रीजचे सुपर स्टार थलैवा रजनीकांत यांचा ‘ जेलर-२’ चार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.म्हणजे लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे संकेत टीझरच्या माध्यमातून दिले आहेत. टिझर मध्ये रजनीकांत पुन्हा ॲक्शन पोज मध्ये दिसत आहेत. तसेच या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांमध्ये आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आणि मकर संक्रांतीनिमित्त रजनीकांत यांनी चाहत्यांना दिली खास भेट२०२३ मध्ये रजनीकांतचा ‘जेलर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी तगडी कमाई केली होती. कारण सुपर स्टार रजनीकांत यांची चित्रपटातील पडद्यावरील एंट्री, डायलॉग,ॲक्शन, त्यांचं हसनं,चष्मा घालून,सिगार ओढने हे त्यांच्या चाहत्यांना खूप खूप आवडत त्यामुळेच इतकी वर्षे झाली. वयाच्या ७४ व्या वर्षीही तो पडद्यावर दमदार अ‍ॅक्शन दाखवताना दिसत आहे. आजही त्यांचा जलवा आजही कायम आहे.पोंगल आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी ‘जेलर २’ चा टीझर रिलीज करून रजनीकांत यांनी चाहत्यांना एक भेट दिली आहे. तसेच आता या चित्रपटाचा जबदस्त टिझर रिलीज झाला आहे.टीझरच्या सुरुवातीला ‘जेलर २’ चे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध नवीन पटकथेवर चर्चा करताना दिसत आहेत. अचानक सगळीकडे गोळीबार आणि तोडफोड सुरू होते. मग रजनीकांत एक धमाकेदार एन्ट्री करतो. एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन, रजनीकांतने प्रवेश केला आहे. या टीझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.टीझरचा एकूण कालावधी चार मिनिटे आहे आणि तो खूपच मनोरंजक आहे. ‘जेलर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा रजनीकांतच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.सध्या सोशल मीडियावर टीझरला खूप छान प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button