“अक्षय शिंदेंच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार”- उच्च न्यायालय

द फ्रेम न्यूज
मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर पोलिसांकडून करण्यात आला होता.त्यावर न्यायालयात आज सुनावणीत होती. त्यावर न्यायालयाने या प्रकरणावर महत्त्वाची नोंद केली आहे या प्रकरणाच्या चौकशी अहवालानुसार या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयाने नोंदवल आहे या अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते त्यांना फळाचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती त्यामुळे राज्याने या पोलिसांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आवश्यक आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे दरम्यान या सुनावणीनंतर विरोधी पक्ष महायुती सरकार तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले ” या एन्काऊंटर ची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आहे. कारण एकनाथ चा एक न्याय आणि देवा भाऊचा न्याय म्हणून स्वतःला हिरो म्हणून घेण्यासाठी या एन्काऊंटर चे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवड नुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे”. असे कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक पोस्ट शेअर केली आहे.
उच्च न्यायालयाने काय म्हणाले पहा.

न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे आणि डॉ.नीला गोखले यांच्या खंडपीठाने आज 20 जानेवारी खुल्या न्यायालयात एका एन्काऊंटर प्रकरणावरील तपास अहवालाचे वाचन केले ते असे म्हणाले की “संकलित केलेले साहित्य आणि एफएसएल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस मृत्यूला जबाबदार आहेत” असेही खंडपीठाने म्हटलं आहे योग्य आहे.