अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : अभिनेता सैफ अली खान वर त्याच्या राहत्या घरी पहाटे ३:३० ते ४ च्या सुमारास हल्ला झालेला आहे. हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत सैफ अली खान त्याच्या घरी असताना त्याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला त्या व्यक्तीने सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीबरोबर वाद घातला. वाद काय सुरू आहे, आणि सैफने हस्तक्षेप करून शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्या अज्ञात इसमाने सैफ हल्ला वर केला.या घटनेत सैफ अली खानला गंभीर जखमा झाल्या आहेत. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉ.नीरज उत्तमनी यांनी सांगितले की ” सैफला सहा जखमा झालेल्या आहेत त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम मनक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शास्त्रीय क्रिया करत आहोत. असे लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ.नीरज उत्तमनी म्हणाले.