मूकनायक' राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ मा.पत्रकार दिवाकर शेजवळ यांना प्रदान करण्यात आला.
शाक्यमुनि प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने आयोजित 'मूकनायक' राज्यस्तरीय पुरस्कार २०२५

छत्रपती संभाजीनगर : मूकनायक राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ पुरस्कारार्थी मा.दिवाकर शेजवळ यांना प्रदान करण्यात आला. शक्य मुनी प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने आयोजित मूकनायक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२५ माननीय श्री दिवाकर शेजवळ कार्यकारणी सदस्य मुंबई मराठी पत्रकार संघ यांना रविवारी दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी वेळ सकाळी ११ वाजता अशोका सभागृह पीई एस अभियांत्रिकी महाविद्यालय,नागसेन वन छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲड. जयमंगल धनराज (मा.प्रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लाॅ. कॉलेज वडाळा मुंबई). कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शरद वंजारे ( अध्यक्ष शाक्यमुनी प्रतिष्ठान, बीड) प्रमुख अतिथी मा.अशोक सिरसे (प्रकल्प संचालक, छत्रपती संभाजीनगर)मा.विजय बहादुरे (उपसंपादक दे.पुण्य नगरी छत्रपती संभाजीनगर) कार्यक्रमाला उपस्थित होते.