" मोबिलिटी क्षेत्रातील परिवर्तनामुळे भारताचा विकास जलद होईल " - नरेंद्र मोदी
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोने आणखी विस्तार साधला असून, देश वाहन उद्योगाच्या भविष्याकडे सकारात्मक पाऊल टाकत आहे."

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं भारतातलं सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चं उद्घाटन केलं. त्यानंतर ते असे म्हणाले की,

” मोबिलिटी क्षेत्रातलं अभूतपूर्व परिवर्तन आणि झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे विकसित भारताचा प्रवास अधिक जलद होईल,”” तसेच भारत ग्रीन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन इंधन आणि जैवइंधनांच्या विकासावर भर देत असल्याचंही ते म्हणाले. यावर्षी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोने आणखी विस्तार साधला असून, देश वाहन उद्योगाच्या भविष्याकडे सकारात्मक पाऊल टाकत आहे.”असे पंतप्रधान म्हणाले. दिल्लीतील भारत मंडपम् इथं भारतातलं सर्वात मोठं परिवहन प्रदर्शनाला आज सुरुवात झाली. या प्रदर्शना मध्ये ४० हून अधिक नवीन वाहने, उत्पादने लाँच केली जातील. यासोबतच बॅटरी, टायर आणि इलेक्ट्रॉनिक शोचेही आयोजन करण्यात येणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव विमल आनंद यांनी सांगितले की, गेल्या वेळी ऑटो एक्स्पो फक्त दिल्लीच्या मंडपममध्ये आयोजित करण्यात आला होता, परंतु यावेळी तो तिप्पट मोठा असेल. भारत मंडपममध्ये ‘इलेक्ट्रॉनिक शो’ होणार आहे.
‘ऑटो शो’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. भारत मंडपममध्ये बॅटरी शो, टायर शो आणि इलेक्ट्रॉनिक शो यासह मोटर वाहन क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ‘ या एक्स्पोमध्ये केवळ भारतीय वाहन कंपन्याच सहभागी होणार नाहीत, तर अमेरिका, जपान, जर्मनी, इटली, सिंगापूर आणि चीनसह जगभरातील कंपन्या सहभागी होणार आहेत.