पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांद्वारे आयोजित नागसेन फेस्टीवल आजपासून सुरू

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : भीम जयंती निमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांद्वारे आयोजित नागसेन फेस्टिव्हल जल्लोष भीम जयंतीचा महोत्सव विचारांचा हा कार्यक्रम आजपासून २८, २९,३० मार्च २०२५ तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत असणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री मा. सुधाकर ओलवे (ज्येष्ठ फोटो जर्नलिस्ट ) यांच्या हस्ते होणार आहे. ‘लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी फुले आंबेडकरी चळवळीची प्रासंगिकता’ हा विषय व्याख्यानासाठी असणार आहे.तसेच नागसेन फेस्टिव्हल करिता प्रमुख वक्ते म्हणून मा. कमलेश सुतार संपादक झी २४ तास, मा. यशवंत वटकर (नि.सहा.पोलीस महानिरीक्षक, मुंबई), विशेष उपस्थिती या. शुभा गोखले (चित्रकार), मा.कैलास वाघमारे मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेते, विशेष उपस्थिती मा. ऋतुराज वानखेडे (सिनेअभिनेता) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागसेन फेस्टिव्हल कार्यक्रमात चित्रकला, छायाचित्र, शिल्पकला, पोट्रेट,कॅलिग्राफी, स्टोन आर्ट,वुडन आर्ट, मुक्तकला, आणि इतर कला प्रकारातील कलाकृतींचे प्रदर्शन सुद्धा होणार आहे. तसेच जगप्रसिद्ध छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर उलवे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुद्धा होणार आहे. स्थळ: लुंबिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)