डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महासमितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे आज उदघाटन..!
उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे महासमिती अध्यक्ष विजय मगरे यांचे आवाहन

छञपती संभाजीनगर | दि.९ :* निराला बाजार, ओल्ड केएफसी बिल्डिंग, मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती उत्सव महासामितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सर्व धर्मीय धर्मगुरु यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता होईल. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती उत्सव महासमितीचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शिंदे, उत्सव महासमितीचे नवनर्वाचित अध्यक्ष विजय मगरे मुख्य सल्लागार मिलिंद दाभाडे, मुख्य समन्वयक गौतम खरात, गौतम लांडगे, कार्याध्यक्ष महेंद्र सोनवणे, स्वागतध्यक्ष चंद्रकांत हिवराळे, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष भिंगारे यांनी दिली.मध्यवर्ती कार्यालयाच्या सोहळ्याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती राहणार असुन यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, व अपारंपरिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, डॉ. भागवत कराड, डॉ.कल्याण काळे, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी खा.इम्तियाज जलील, माजी खा. चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रशांत बंब, रमेश बोरणारे, विलास भुमरे, संजना जाधव, अनुराधा चव्हाण, जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अभिजित देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडले, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत आदींची प्रमूख उपस्थिती राहील.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची १३४ वी जयंती यंदा समाजाभिमुख विविध उपक्रमांनी येत्या १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरातील भीमजयंतीचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी अविस्मरणीय ठरणार आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात क्रांती चौक तसेच भडकल गेट येथे साजरा करण्यात येणार असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय मगरे यांनी स्पष्ट केले. या उदघाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शिंदे, उत्सव महासमितीचे नवनर्वाचित अध्यक्ष विजय मगरे मुख्य सल्लागार मिलिंद दाभाडे, मुख्य समन्वयक गौतम खरात, गौतम लांडगे, कार्याध्यक्ष महेंद्र सोनवणे, स्वागतध्यक्ष चंद्रकांत हिवराळे, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष भिंगारे संस्थापक समितीचे ऍड. रमेशभाई खंडागळे, दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, रामभाऊ पेरकर, कृष्णा बनकर, राजू आमराव, रुपचंद वाघमारे, भगवान रगडे, बंडू कांबळे. जालिंदर शेंडगे, राहुल सोनवणे. उपाध्यक्ष राहुल सावंत, इंजि. मुकुल निकाळजे, विनोद बनकर, कृष्णा भंडारे. कार्यालयीन सचिव विजय वाहूळ, विशाल दाभाडे, मिलिंद बनसोडे, डॉ. निलेश आंबेवाडीकर, कार्यकारिणी सदस्य राहुल साळवे, दामूअण्णा कांबळे, भरत दाभाडे, संदीप जाधव, राजू भालेराव, भूषण हिवाळे, नाना म्हस्के, प्रकाश जाधव, मनोज जाधव, प्रकाश गायकवाड, माणिक साळवे, नंदू बनकर, बालाजी सूर्यवंशी, नागेश जावळे, डॉ. कुणाल खरात, संदेश शेळके. महिला कार्यकारिणीच्या रेखा राऊत, रेखा मुळे, विजया बनकर, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, यांनी महासमितीच्या वतीने केले आहे.