कांग्रेसताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय
उ. बा. ठा.आणि कांग्रेसला राजकीय धक्का बसणार?
राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार - राहुल शेवाळे

द फ्रेम न्यूज
मुंबई :उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १५ आमदार, कांग्रेस पक्षाचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. तसेच पुढे ते असे म्हणाले की केंद्रातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे.केंद्रात आणि राज्यात राजकीय भूकंप होणार असल्यामुळे संजय राऊत, आणि विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं आहे. ” कांग्रेसचे काही आमदार आणि उ.बा.ठा. चे आमदार हे शिवसेनेत प्रवेश करण्याकरिता उत्सुक आहेत.त्यांची संख्या १५,१० अशी आहे. त्यामुळे कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो. आपल्या पक्षाचा अस्त, दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतः च्या अस्ता कडे लक्ष द्या. तसेच २३ तारखेला राजकीय भूकंप होणार आहे त्या करिता ह्या खोट्या बातम्या पसरल्या जात आहेत.” असे राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.