बीड जिल्ह्यात शस्त्र परवान्यांचे अवलोकन सुरू


बीड : जिल्ह्यात शस्त्र परवान्यांचे अवलोकन सुरू झाले आहे. कायद्याप्रमाणे पडताळणी करून ज्यांना गरज नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील. अवैध धंदे, बेकायदेशीर कामांवर पोलीस दलाकडून थेट कारवाई करण्याचे निर्देश आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.पुढे ते असे म्हणाले की ” शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्रांचे लायसन्स आहेत. त्या सगळ्या शस्त्रांचे अवलोकन सुरू आहे. आणि ज्यामध्ये शस्त्रामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. कलेक्टर साहेबांशी माझी भेट झाली. कायद्याच्या हिशोबाने शस्त्राची खरच गरज आहे की नाही. आता अनालिसिस सुरू आहे. ज्यांना नक्कीच गरज नाहीये अशांचे शस्त्र परवाना रद्द करण्यात येईल.”शस्त्रांच्या बाबतीत जेवढ्या ही फाईल्स आहेत त्या सर्व फाइल्सचं पूर्ण अवलोकन सुरू आहे. आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो काही अधिकार आहे तो कलेक्टर ऑफिस कडे असतो आणि पोलीस त्याच एनालिसिस करते. त्याच पास्ट आणि हिस्टरी च्या बाबतीत प्रत्येक फाइल्स चेक करणार आहोत ज्यांना ज्यांना शस्त्राची गरज नाही त्यांचे आम्ही परवाने रद्द करू.पुढे बीड पोलीस आता वरिष्ठांच्यां मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे की जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कंट्रोल ठेवू कायदा सुव्यवस्था राखू .सोशल मीडियावरील युवकांना मी सांगितलेल आहे की व्हिडिओ किंवा अशा प्रकारे दहशत पसरविणारे व्हिडिओ, फोटो, हे सोशल मीडियावर व्हायरल होत कामा नये. जर केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. यापूर्वीही बीड पोलिसांमध्ये तीन चार गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि त्यांचे शस्त्र परवाने सुद्धा रद्द करण्याच्या बाबतीत प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये. जर का अशा पोस्ट पोलिसांपर्यंत पोहोचल्या तर क्राईम डिसक्लूज झाला तर त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करू.