ताज्या बातम्यालेख
Trending

रमा भिमाचे लग्नआहे,या शुभकार्याला अवरजून उपस्थित राहावे हिचं धोत्रे आणि आंबेडकरांची विनंती आहे.?

लग्न दि,४ एप्रिल १९०७ साली झाले.

पुर्वी लग्नाची प्रथा एक आगळी वेगळी होती,पांचान पाच दिस लग्न चालतं होते, कारणं तेव्हा आताच्या सारखे आधोनिक विज्ञान उपलब्ध नसल्या कारणाने,माणस जात्यावर बसून दळन दळत होते,मग काय चुलीवरच्या ज्वारीच्या भाकऱ्या, वरुन तुरीच्या पिठाचे चुंन ते भळभळ पण इतके खमंग लागत होते, तेव्हा घरचे दळन म्हणून ते ताजेतवाने सकस आहार राहातं होता, सुभेदार रामजीने शेल्याच्या पदराला कुंखू बांधून आखद देवुन आमंत्रित केले होते ,पाई प्रवास असल्या कारणाने सर्व पाहूने राहून्याला आमंत्रण देवून झाले,भिमाचे लग्न म्हणुन वऱ्हाड आदल्या दिवशी आलं होतं,१,२,३ दिवसांनी काही आले होते, कुणी दळत होते तर कुणी सरपन आनत होते, तर कुणी किक्सा दळत होत्या,तिनं तारखेला हळद लावण्यासाठी सर्व सुवासिनी जमल्या दिस असताना चला वरवधुला हळद लावू,तरपाच करे ठेवले त्याला पाच सुताचे फेरे मारले,मधी चौरंग ठेवला,त्यावर भिमराव बसले बाजूला एक फिढ ठेवलं त्यावर रमा बसली दोघांना दोन गंगाळ पाणी टाकलं, आणि पाचजनी सुवासिनी आपल्या ठेवनीचे गाणे म्हणत होत्या, लग्नातले गाणे म्हणजे खुप मजेदार असतात, कविचे गाणे तेव्हा सुवासिनी गात होत्या, हे लग्न दि,४ एप्रिल १९०७ साली झाले.

हाळद लावा गं आपल्या भिमा रमाईला आपल्या भिमा रमाईला सुर्याची चांदनी बाई यांनी ग द्या आशिर्वाद बाई त्याला ग  !!१!!

सोन्याच चौरंगावर भिम बसले नाह्याला भिम बसले नाह्याला ऽऽऽचांदाच्या चांदनीला बाई निला ना आले सारेच पाह्याला बाई याला ना. !!२!!

असे गुणवान दोन्ही, दोन्ही पखांन हे उनी दोन्ही पखांन हे उनी  ऽऽयांची किरती जाईल गगनी ग बाई गगनी ग !!३!!

लाबटाच ताट केलं ईहिनबाईलामाह्या ईहिनबाईला दोन दिवसाची उपासी बाई उपासी बाई उपासी नाही पुरले कुटके तिला बाई तिला ना. !!४!!

नात जवायाला आंधन काय देऊ त्याला आंधन काय देऊ त्याला टिपऱ्याची गाडी बाई गाडी ना मुंगळ्याची जोडी त्याला बाई त्याला ना. !!५!!

भिकू धोतरे आणि ते सुभेदार, आणि ते सुभेदार मोठ करतील नाव बाई नाव ना साऱ्या दुनियाभर बाई भर ना. !!६!!

हळदीचा कार्यक्रम संपला आता,उध्याची तयारी सुरू झाली, काही मंडळीने पात्र दूरंन लावण्यास सुरुवात केली काही आढी खोदून वर ढेग ठेवून तयार झाले,दारावर मांडव टाकला होता, भायखळ्याच्या भाजी मंडईत हा लग्नाचा प्रारंभ केला होता, भायखळ्याचीडबकचाळ अवघी दनानु गेली होती, भिमाचे लग्न तुपाचा शिरा भाजला होता, तेव्हा सर्व गल्लीने स्वयंपाकांचा घमंघमाट स्वास घुटमळत होता, शेजारी वरच्या वाड्यातील लोकांना वाटत होते, की आपन हीतो अस्वाद घ्यावा  लग्नाला जावाव पण ते अस्पृश्य आहेत, असे वाटत होते, रात्रभर गाणे म्हणत होत्या, त्या गाण्याच्या नांदात, सारे घर गल्ली गजबजून गेली होती, लग्नाची वेळ होती, गोरज मुहूर्ताची मग सारेच वऱ्हाड जागीच होते, नवरीला सुभेदार रामजी बाबानेआपल्या घरी उचलून आनली होती, कारणं रमाच्या घरचे कुणी नसल्याने दोन्ही पंखाने उनी मुलगी होती सुभेदार रामजी पिता झाले होते,रात्रीचा तिसरा प्रहर संपला की नवरी नवरदेवाला आंघोळ घातली वधु वराला सजविले, आणि दिस निघताक्षणी लग्नाच्या कार्याला सुरुवात झाली, नवरदेवाला चौरंग ठेवला वधुला पाट ठेवला आणि, मंगलाष्टका सुरू झाल्या तेव्हा आकाशात कापसाच्या बोंडायेवढा सुध्दा ढग नव्हता,एकाक्षणात भरभर ढग जमा झाले, आणि धो धो पाणी बरसला,सर्वत्र पाणीच पाणी झाले, काय तर नाला तुडूंब भरुन आला, लग्न भायखळ्याच्या भाजी मंडईत होते,तिथले दुकानदार फारच घाई करतं होते, सर्वच लोक स्तब्ध झाले, तेवढ्यात नाला भरुन आला आणि रमाभिमाच्या पायाला त्या घान पाण्याने स्पर्श केला, ते पाणी म्हणत होते, आम्ही नाले यापुढे तुमच्या पायाचे दर्शन घेणार नाही, कारणं तुमचे चरण आम्हाला स्पर्श करता येणार नाही, पुढे आम्ही भुमीगत होवु आज तेच मंडईतले लोक डॉ.बाबासाहेबाचे गुण गातात आणि आज मुंबईत नाले भुमीगत होवुन दिसतं नाहीत, ज्या ज्या अमंगळ मनाच्या माणसाने डॉ.बाबासाहेबांना आड आले ते ते सरके झाले,असा होता लग्न सोहळा जे जे या लग्नाला आले त्यांना त्यांना मेवा मिठाई तर मिळाली, पण चेंद्र सुर्याचे दर्शन झालं ते उध्दरुन गेले धन्ये ते लग्न धन्य ते आई पिता धन्य ते भारताचे मार्गदाता आज दि,४,४,२०२५ रोजी ११८ वर्ष होत आहेत या लग्न दिनानिमित्त जे जे लग्नाला आले त्यांना वरवधुला सुभेच्छा तर दिल्या पण आमच्या तर्फे भारतीय बंधु भगिनींना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आपन आलात आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद जयभिम लेखक, बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६ / ७६६६७४९३०३ दि ४,४२०२५वेळ ७,१५ सकाळी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button