स्व.वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी..!

छत्रपती संभाजीनगर : आज बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिडको येथील वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त सर्व बंजारा समाजातील बांधव एकत्रितपणे सिडकोच्या चौकात जमले होते. संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात “संत सेवालाल महाराज की जय” “जय बंजारा” अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून गेला होता.

कार्यक्रमाच्या ठिकाणी बंजारा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आज भारतातील आणि महाराष्ट्रातील १५ कोटी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांची जयंती आहे.आणि या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण स्व.वसंतराव नाईक चौक सिडको छत्रपती संभाजीनगर इथं आम्ही जमलेलो आहे जन्मोत्सवा निमित्ताने जवळ जवळ पंधरा ते वीस ढोल ताशा पथकांची आम्ही एक स्पर्धा ठेवलेली आहे. त्यानिमित्ताने सर्वजण अभिवादन करण्यासाठी आले आहेत या शांती आणि समतेच्या संदेश देणारे संत सेवालाल महाराज या निमित्ताने पूर्ण भारतातील बंजारा समाजाला आव्हान करायचा आहे की त्यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत त्या विचारावर आपण सर्वांनी चालावं आणि पुढील पिढी घडवावी संत सेवालाल महाराज प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य केलेला आहे. त्यामुळे संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा पाईक होऊन आम्ही या पुढे आम्ही कार्यरत राहू”
श्री.रविकांत राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा ब्रिगेड)