खुरगावला १९ रोजी 'पौर्णिमोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन
१९ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात 'महाडच्या चवदार तळ्याचा क्रांतीसंगर' विषयावर मान्यवर बोलणार आहेत

द फ्रेम न्यूज नेटवर्क :
राजकिरन गव्हाणे (जिल्हा प्रतिनिधी)
नांदेड – फाल्गुन पौर्णिमा ही मार्च महिन्यामध्ये येते. या पौर्णिमेला राजा सिद्धोधन यांच्या निमंत्रणावरुन तथागत भगवान गौतम बुद्ध हे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदाच कपिलवस्तू या ठिकाणी आपल्या जन्म गावास भेट दिली. या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध भिक्षाटन करत असतांना पाहून राजा सिद्धोधनास दुःख झाले. त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सांगितलं की, आमचा बुद्ध वंश आहे; राजवंश नाही. चारिका करण्याची परंपरा तथागत गौतम बुद्धांनी पाळली. नंतर राजा सिद्धोधन भगवान गौतम बुद्ध आणि बुद्ध संघास भोजनाचे निमंत्रण दिले आणि भोजनानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाने प्रवचन दिले. या प्रवचनानंतर राजासिद्धोधन स्रोतापन्न झाले याच भेटीच्या नंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा मुलगा राहूल, चुलत भाऊ आनंद आणि देवदत्त हेही बौद्ध भंते झाले.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मार्च रोजीसकाळी ११ वा. फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महाडच्या चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या पूर्व संध्येला क्रांती दिनानिमित्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली. ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात महिन्याच्या दर पौर्णिमेला पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ३६५ दिवस चालणाऱ्या व २४ तास श्रामणेर दिक्षेकरिता सुरू राहणाऱ्या या केंद्रात जिल्हा, जिल्हा परिसर आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांतून उपासक दीक्षा घेण्यासाठी येत असतात. यासाठी दस दिवशीय श्रामणेर शिबिरांचे आयोजन करण्यात येते. येत्या बुधवारी १९ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ‘महाडच्या चवदार तळ्याचा क्रांतीसंगर’ विषयावर मान्यवर बोलणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी अकरा वाजेपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, गाथापठण, भोजनदान, आर्थिक दान, औषधी तथा विविध वस्तूंचे दान, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांच्या गायनाचे कार्यक्रम, क्रांती दिननिमित्त कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.