छत्रपती संभाजीनगर येथे भव्य ॲग्री एक्स्पो कृषी प्रदर्शन
ॲग्री एक्स्पो २५’ला यंदा एक लाखाहून अधिक प्रगतिशील शेतकरी भेट देण्याचा अंदाज आहे


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर मध्ये १० ते १३ जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांकरिता शेती ऍग्रो कल्चर चे भव्य प्रदर्शन आले आहे.छत्रपती संभाजीनगर येथे शेतीमधील नवे तंत्रज्ञान व शेतीविषयक माहिती सादर करणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे भव्य ‘ॲग्री एक्स्पो २५’ हे कृषी प्रदर्शन यंदा १० ते १३ जानेवारी दरम्यान दिमाखात सुर झाले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची शेतकरीवर्ग आणि शेती विषयक व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात उत्सुकता सर्वांना लागली होती.छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूल जवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत असून प्रवेश विनामूल्य आहे.या प्रदर्शनाला शेतकरी वर्गाचे खास आकर्षण गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट आयोजनात आघाडी घेणारे ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आधुनिक अवजारे, कृषिविषयक ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची या प्रदर्शनात पर्वणी समजली जाते. देशविदेशांतील नामवंत ॲग्रो ब्रॅण्ड्स एकाच छताखाली शेतकरी वर्गास येथे पहावयास मिळते. ‘समृद्ध महाराष्ट्र म्हणजेच समृद्ध शेती’ व्यवस्था असा संदेश देत आधुनिक शेतीचे धडे देणाऱ्या ॲग्रोवनच्या प्रदर्शनाकडून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देतात.अनेक नवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शेती अवजारे यांविषयी माहिती दिली जाते.राज्यातील कोरडवाहू व बागायती शेतकऱ्याला नवे प्रयोग करण्यास प्रेरणा देण्याचे या प्रदर्शनाच्या निमित्ताने होते आहे. ‘ॲग्री एक्स्पो २५’ला यंदा एक लाखाहून अधिक प्रगतिशील शेतकरी भेट देण्याचा अंदाज आहे. या प्रदर्शनातील २०० वर स्टॉल्सपैकी १०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचे स्टॉल्स आहेत.कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित असलेल्या या प्रदर्शनात काही कंपन्या नव्या ‘ब्रॅण्ड्स’चे लाँचिंग करणार आहेत. प्रदर्शनातील स्टॉल्स बुकिंगला यंदाही उत्तम प्रतिसाद लाभला आहे. गेल्या वर्षी लाखाहून अधिक प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. कृषी क्षेत्रातील नवतंत्र प्रात्यक्षिकांसह समजावून घेण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होतो.यंत्र, नवतंत्र सर्वत्रयंदाच्या कृषी प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर तंत्रज्ञान-यंत्रे शेतकऱ्यांना एकाच छताखाली पाहावयास मिळणार आहेत. कृषी शास्त्रज्ञ, संशोधक व अभ्यासकांना भेटता येणार आहे. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन उद्योगातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. ॲग्रिकोन न्यूट्रिटेक हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून एन्झोकेम ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज,पवन ॲग्रो, पितांबरी ॲग्रो केअर डिव्हिजन, बी. जी. चितळे डेअरी, आत्मा (ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी), मेडा (महाऊर्जा), एमएआयडीसी हे सहप्रायोजक आहेत. तसेच रोहित कृषी इंडस्ट्रीज, इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) हे गिफ्ट स्पॉन्सरर्स आहेत.