छत्रपती संभाजीनगर येथे १०व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव


छत्रपती संभाजी नगर : शहरात दिनांक १५ ते १९ जानेवारी दरम्यान दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ६५ चित्रपट पाहण्याची सिने रसिकांना संधी मिळणार आहे.प्रसिद्ध चित्रपट सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची प्रकट मुलाखत आणि सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक फराह खान यांचा सुद्धा मास्टर क्लास व दोन दिवस परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती महोत्सवाचे संचालक सुनील कर चंद्रकांत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की शहरातील पीव्हीआर आयनॉक्स येथे हा महोत्सव सुरू होत आहे. या उत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धेत नऊ सिनेमांचा समावेश आहे सर्वोत्कृष्ट सिनेमाला सुवर्ण कैलास पारितोषक व एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल तसेच या स्पर्धेसाठी ज्यूरी अध्यक्ष म्हणून अभिनेत्री सीमा विश्वास तर सदस्य म्हणून छायाचित्रकार सी के मुरलीधरण ज्येष्ठ संकलन दीपा भाटिया ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी आणि पटकथा लेखक गिरीश जोशी यांचा समावेश असेल. तसेच या महोत्सवामध्ये १०५ वर्षांपूर्वीच्या ‘कालिया मर्दन’ या मुखपटाचे प्रदर्शन १५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता रुक्मिणी सभागृहात होईल.यानंतर महोत्सवाच्या उद्घाटनाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अशी शेलार आणि महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांची उपस्थिती असेल. तसेच या उत्सवामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच दिनांक १६ रोजी सायंकाळी सहा वाजता आशुतोष गोवारीकर यांची प्रकट मुलाखत सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी घेतील दिनांक १७ रोजी बारा वाजता ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा या विषयावर परिसंवाद होईल तर सायंकाळी सहा वाजता मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट या विषयावर परिसंवाद होईल तसेच मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा चित्रपट रसग्रहणकारी शाळा आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच रात्री नऊ वाजता प्रोझोन मॉल मधील पीव्हीआर आयनॉक्स येथे ‘लिटिल जाफना’ ही तमिळ आणि फ्रेंच भाषेतील ओपनिंग फिल्म प्रदर्शित होईल तर ‘द रूम नेक्स्ट डोअर’ ही इंग्रजी फिल्म दाखवण्यात येईल तर क्लोजिंग फिल्म म्हणून ‘द सीड ऑफ सॅक्रेट’ फिग’ हा चित्रपट पाहण्याची संधी सिने रसिकांना मिळणार आहे.