मौनी अमावस्येला महाकुंभा मध्ये चेंगराचेंगरी झाल्याने १० भाविकांचा मृत्यू ; आजचं शाही स्नान रद्द!
सहकार्य करा अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

द फ्रेम न्यूज
प्रयागराज : कुंभमेळ्यातील संगम घाटावर मौनी अमावस्येला पहाटेच्या समयी पवित्र स्नान करण्या करिता मोठ्या संख्येने भाविक जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.चिंगरा चिंगरी जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ” संगम घाटावरील ब्रॅकेट्स तुटल्याने काही लोक जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींची नेमकी संख्या किती, याची माहिती अद्याप यांच्याकडे आलेली नाही”. असे कुंभमेळ्यातील विशेष कर्तव्यावरील अधिकारी आकांक्षा राणा यांनी सांगितल आहे.
घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आलेल्या असून जखमींना कुंभमेळ्याच्या सेक्टर दोन मधील तात्पर तयार होणाऱ्या हलवण्यात आले आहे. चिंगराचेंगरी दरम्यान आजचे अमृत्स्नान रद्द करण्यात आल्याचे आखाडा परिषदेने जाहीर केले आहे. तसेच संगम घाटावर जाऊन स्नान करण्याचे आवाहन करण्यात आले असून नजीकच्या इतर घाटावर जाऊन स्नान करण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून माहितीचे अहवाल केले आहे तर केंद्रीय गृहमंत्री यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले ” मौनी अमावस्या निमित्त पवित्र शाही स्नान करण्यासाठी संगम घाटावर गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली होती रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ कुंभमेळ्यातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”
आतापर्यंत या घटनेत १० भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भाविकांना आवाहन नजीकच्या घाटावरच स्नान करण्याचं भाविकांना आवाहन. सहकार्य करा अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा असे म्हणाले आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तीन वेळा फोनवरून चर्चा झाली आहे शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत कुंभमेळ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.