डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ येत्या २२ तारखेला होणार


विद्यार्थ्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा विभागात आवेदनपत्र दाखल करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ येत्या २२ फेब्रुवारीला होणार आहे. मागील शैक्षणिक वर्षात पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांच्या पदविका, पदवी, पदव्यूत्तर पदवी या समारंभात प्रदान करण्यात येतील. दीक्षांत सोहळ्यात पदवी घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा विभागात आवेदनपत्र दाखल करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १४ जून २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण केला.तसेच शोधप्रबंध पूर्ण करून, पीएच.डी प्राप्त करणारे संशोधकही या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी आवेदन दाखल करू शकतात, असं विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी सांगितलं आहे.