बोलेरो पिकअपची दुचाकीला जोराची धडक, दोघेजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी.

राजकिरण गव्हाणे नांदेड
उमरी ते धर्माबाद राज्य रोडवरील राजापूर चौरस्त्यावर बुधवारी सायंकाळी बोलेरो पिकअप व दुचाकीच्या धडकेत 2 जण ठार तर 2 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, पिकअप क्र.TS-18-T-7208 हे वाहन धर्माबादकडून उमरीकडे येत असताना दुचाकी क्र. MH-26-AG-6318 हे पांगरीकडून राजापूरकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
त्यात दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून ह्या अपघातात शेख अयाज शेख सलीम वय 25 वर्ष रा. फुलेनगर धर्माबाद व कपिल बाबुराव गायकवाड वय 24 वर्ष रा. करखेली ह्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
गंभीर जखमी झालेले मुकुंद रामा क्षीरसागर व राजू लक्ष्मण कांबळे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती धर्माबाद पोलिसांना मिळताच.
ते घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.