स्वास्थ/ सेहत

आरोग्यासाठी व्यायाम करणे किती महत्त्वाचे...!

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात शरीराकरिता व्यायाम हा किती महत्त्वाचा घटक आहे.

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात शरीराकरिता व्यायाम हा किती महत्त्वाचा घटक आहे.

आरोग्यासाठी व्यायाम करणे आणि खेळ खेळणे किती महत्त्वाचे.
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात शरीराकरिता व्यायाम हा किती महत्त्वाचा घटक आहे. हे आज आपण समजून घेणार आहोत. कारण व्यायाम म्हणजे पहिलवान किंवा पीळदार शरीरयष्टी असणं किंवा शरीर बळकट बनवणे म्हणजे व्यायाम नव्हे तर निरोगी राहण्यासाठी ही व्यायाम करावा लागतो हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व्यायामाची आवड तशी कमी आहे. त्यातल्या त्यात सुशिक्षित, सुख सोयी असणाऱ्या समाजात तर व्यायामाची आवड फारच कमी दिसून येते. आज जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्याच्या समस्या जाणवतील या सर्व हळूहळू वाढणाऱ्या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते व्यायाम करणे ही अंगवळणी पडते. व्यायामाची सवय लहानपणापासूनच लावली पाहिजे. प्रत्येकाने काही ना काही व्यायाम नियमितपणे करायला पाहिजे. व्यायाम म्हणजे नेमके काय हेही समजायला पाहिजे काहीजण तर थोडेफार चालणे, यालाच व्यायाम समजतात. व्यायाम अनेक प्रकारचे आहेत सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमितपणे करणे आवश्यक आहे.
म्हणूनच व्यायामाचे महत्त्व किंवा व्यायाम नाही केला तर खालील दुष्परिणाम होतात.
१) एकूण शारीरिक क्षमता, सहनशक्ती कमी होते.
२) हृदय लवकरच जीर्ण व दुबळे होते.
३) सांधे आखडणे आणि स्नायू दुबळे होणे या आरोग्य समस्या लवकर उत्पन्न होतात.
४) रक्तातली साखर वाढून मधुमेह सुद्धा होऊ शकतो.
५) शरीरात चरबी साठणे पोट सुटणे शुद्ध रक्तवाहिन्यात चरबीचे थर साठणे त्यामुळे रक्तवाहिन्यांत अडथळे होणे.
६) भूक व पचनशक्ती बंद होणे.
अशा अनेक व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुष्परिणाम परिणामांना सामोरे जावे लागते.
शारीरिक स्वास्थ टिकवून ठेवणे म्हणजे व्यायाम. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीरातील उत्साह संचारला जातो. शरीर हे दिवसभर ऊर्जात्मक स्वरूपाने काम करत असते. तसे व्यायामाने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य ही उत्तम राहते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेत वेळ काढून दररोज नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.
आता नियमितपणे व्यायाम मध्ये कोणकोणते व्यायाम करावे. १) योगा २) सूर्यनमस्कार
३) प्राणायाम किंवा विपश्यना करणे लाभदायक ठरते.
४) एरोबिक्स व्यायाम उदा. चालणे, धावणे, नृत्य, पोहणे, सायकल चालविणे.
५) वजन उचलणे.
दररोज व्यायाम केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि यामुळे माणूस आनंदी राहतो. तसेच आपली मानसिक शारीरिक शक्तीचा विकास होतो. आजकाल लहान मुलांमध्येही शारीरिक समस्या पाहायला मिळत आहेत. मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा ही सध्याची खूप गंभीर व जागतिक समस्या उद्भवत आहे. पण दररोज लहान मुलांना व्यायाम करण्याच्या सवय लावल्यामुळे ह्या समस्या कमी होण्यास मदत होत आहेत.

व्यायाम करण्याचे फायदे

१) वजन नियंत्रित राहण्यास मदत करते.
२) शारीरिक क्षमतेमध्ये दैनंदिन वाढ होते.
३) नैराश्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
४) शरीर पिळदार होते.
५) रोगप्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होते.
६) स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
म्हणून नियमितपणे व्यायाम केल्याने तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ही लाभदायक ठरते. म्हणून नियमितपणे स्वतःकरिता वेळात वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. हा लेख आवडल्यास जरूर कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button