२०७वा शौर्यदिन उत्साहात साजरा मानवंदना देण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती
फिजिकल रित्याने हा लढा संपला, पण मानसिक रित्याने लढा चालू आहे.


पुणे : २०७वा शौर्यदिन विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळला. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा याठिकाणी शौर्यदीन दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो.विजयस्तभाला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे खरंतर रात्रीपासूनच या ठिकाणी आलोट गर्दी झालेली पाहायला मिळते लाखोंच्या संख्येने संपूर्ण राज्य भरातूनच नाही तर देशभरातून बौद्ध आणि भीमअनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सुध्दा विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले होते.अभिनंदन करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते असे म्हणाले की “ विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते मी असं म्हणतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे. शासन आपल्या परीने सुविधा पुरविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते.पण त्या अपुऱ्या पडत आहे.शासनाने कुठेतरी या गोष्टींचा असा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा अधिक चांगल्या पुरवल्या जातील . अशी अपेक्षा करतो, बार्टी सारखी जी संघटना आहे त्यांनी यांच्यामध्यें अधिक लक्ष घातलं पाहिजे. हा जो संघर्ष आहे, भीमा कोरेगाव चा संघर्ष सुरू आहे. फिजिकल रित्याने हा लढा संपला, पण मानसिक रित्याने लढा चालू आहे. असे मी मानतोय, मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहिल या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल आहेंत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला अभिवादन करण्यासाठी येतं राहतील.आपली स्वतः ची कॉमेंटमेंट आहे. या सगळ्या आपल्या मानवतावादी चळवळीतून दाखवत राहतील अशी परिस्थिती एकंदरीत मी पाहत आहे. ज्यांनी हा लढा सुरू केला.आणि पेशवाईतील जी काही विषमता होती, अमानूष वागणूक होती त्याच्या विरोधातला असणारा लढा होता.फिजीकली लढा संपला पण मानसिक दृष्ट्यिकोणातून लढा चालू आहे. त्याला मी अभिवादन करतो.आणि सैलयूट करतो. असे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे.