छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन रविवारी

पत्रकार परिषदेत मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत यांची माहिती

मराठवाड्यातून दाखल होणार पत्रकार ; विविध परिसंवाद ; मान्यवरांच्या उपस्थितीत मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण सोहळा

द फ्रेम न्यूज

छत्रपती संभाजीनगर : दि. ११ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रोप्य महोत्सवी अधिवेशन रविवार दिनांक 15 रोजी संत एकनाथ रंग मंदिर उस्मानपुरा येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात मराठवाड्यातून पत्रकार दाखल होणार आहेत या अधिवेशनात मराठवाड्यातील कर्तुत्वान पत्रकारांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणारा असून या अधिवेशनाचे उद्घाटन सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष श्री अनिल सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी जेष्ठ पत्रकार मधुकर यांना वैद्य जिल्हा अध्यक्ष डॉके यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी शांतिगिरी महाराज, दुग्ध विकास, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जालना च्या पालकमंत्री पंकजा मुंढे, हिंगोली चे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, परभणी च्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय केणेकर, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदीप कवाडे, सोशल मिडिया चे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची उपस्थिती राहणार आहे तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, राज्य समन्वयक नितीन शिंदे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव तर विशेष अतिथी म्हणून बंगळूर येथील पूर्णब्रम्ह संस्थेच्या प्रशासकीय संचालिका जयंती कठाळे, अभिनेते योगेश शिरसाट, एबीपी माझा च्या संपादिका सरिता कौशिक यांची उपस्थिती राहील.

अधिवेशनात भारतीय माध्यमांचा DNA कोणता ? माध्यमांचे भूत, वर्तमान, आणि भविष्य या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. संवादक म्हणून पुणे येथील अश्विनी डोके, तर सहभागी वक्ते म्हणून एबीपी माझा च्या संपादिका सरिता कौशिक, माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, संजय सोनवणी, विधीज्ञ महेश भोसले, अविनाश वानखेडे, संपादक सुशील कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांची उपस्थिती राहील.

या अधिवेशनासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक देडे, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, प्रदेश उपाध्यक्ष अभयकुमार दांडगे, राज्य निवड समिती अध्यक्ष रुपेश पाडमुख, मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाकेकर यांनी सहकार्य केले आहे. या अधिवेशनात सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप माने, हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन मगर, नांदेड जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, बीड जिल्हाध्यक्ष अमजद खान पठाण, धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, लातूर शहराध्यक्ष माधादेव डोंबे, बीड जिल्हाध्यक्षा शेख आयेशा शेख रफिक, नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे,अधिवेशनाचे आयोजक मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ.छबुराव ताके, शहराध्यक्ष देविदास कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष जे.इ. भांबर्डे, मराठवाडा सल्लागार विलास इंगळे, सहसचिव मनोज पाटणी, सचिव महेंद्र डेंगळे, कार्यकारिणी सदस्य विलास शिंगी, महानगर अध्यक्ष उमेश जोशी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, सल्लागार ज्ञानेश्वर खंदारे, जिल्हा संघटक संजय हिंगोलीकार, संपर्क प्रमुख सुजित ताजने, सहसचिव रवींद्र लांडगे, सहप्रसिद्धी प्रमुख शिवाजी गायकवाड, विजय बनसोड, ज्ञानेश्वर तांबे, संताराम मगर, विजय गायकवाड, नारायण गायकवाड, आनंद अंभोरे, माधव खिल्लारे, चंद्रकांत चाबुकस्वार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रसिद्धी प्रमुख

सचिन लिला सुखदेव अंभोरे

मो. 9970409640 रौप्य महोत्सवी मराठवाडा, विभागीय अधिवेशन-२०२५.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, छत्रपती संभाजीनगर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker