बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करा!
वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रपतींकडे मागणी

वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रपतींकडे मागणी
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. या निवेदनात बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बौद्ध भिक्खूंनी उपोषण सुरू केले असून, हे आंदोलन ११ दिवसांपासून सुरू आहे. अनेक भिक्खूंची तब्येत चिंताजनक असतानाही शासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे. १९४९ च्या व्यवस्थापन अधिनियमात तातडीने सुधारणा करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती सोपविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि देशातील बौद्ध बांधवांच्या भावना लक्षात घेऊन १९४९ च्या व्यवस्थापन अधिनियमात सुधारणा करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष ऍड. पंकज बनसोडे, रुपचंद गाडेकर, भाऊराव गवई, रविरत्न पारखे, किसन दांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.