कृषीताज्या बातम्यास्वास्थ/ सेहत
Trending

उन्हाळ्यात कलिंगड हे फळ म्हणजे शरीरासाठी एक वरदान आहे.

कलिंगडमध्ये असलेले पोषक तत्वे वजन कमी करण्यास मदत करतात.

द फ्रेम न्यूज

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होत असते, अशा वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते.आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो.

मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.

कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते.उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते.

त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात. पर्यायाने अशा वेळी थकवा जाणवतो. त्या वेळी कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो.

कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो. कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो

कलिंगडमध्ये असलेले पाणी शरीरात हायड्रेशन राखते.कलिंगडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशी निरोगी ठेवतात.कलिंगडमध्ये असलेले पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए आणि सी स्नायूंचे कार्य आणि चयापचय वाढवतात.कलिंगडमध्ये असलेले अमिनो अॅसिड सिटुलीन आणि नायट्रिक ऑक्साइड रक्तातील साखर अचानक वाढत नाहीत.कलिंगडमध्ये असलेले पोषक तत्वे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.कलिंगडमध्ये असलेले पोषक तत्वे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात.कलिंगडमध्ये असलेले पोषक तत्वे पचनक्रिया सुधारतात आणि पोटाचे विकार दूर राहतात.कलिंगडमध्ये असलेले पोषक तत्वे वजन कमी करण्यास मदत करतात.कलिंगड खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय पचनक्रियाही सुधारते, व पोटाचे विकार दूर राहतात. कलिंगडामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. त्यात पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए आणि सी असते. जे आरोग्यासाठी उपयुक्त, स्नायूंचे कार्य आणि चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करते. म्हणून कलिंगड हे उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी एक वरदानच म्हणावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button