

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकूलातील २१ कोटींचा का घोटाळा करून फरार झालेला हर्षकुमार क्षिरसागर याला गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी हर्षकुमार आणि त्याचे आई-वडील यांनाही बेड्या ठोकल्या. विभागीय क्रीडा संकुलातील २१.५९ कोटींचा घोटाळा करून गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला. घोटाळेबाज हर्षकुमार क्षिरसागर यास दिल्लीहून अटक करण्यात आली आहे. हर्षकुमारला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले २१ डिसेंबर रोजी उघडकीस आलेल्या घोटाळ्याची देशात चर्चा झाली. कंत्राटी काम करणाऱ्या हर्षकुमारने संकुलासाठी मिळणारा कोट्यावधीचा निधी अकरा महिन्यांमध्ये लंपास केला. सरकारी निधीतून त्याने फ्लॅट, महागड्या गाड्या, सोने आणि हिऱ्यांची दागिने खरेदी केले. तर मैत्रिणीला विमानतळा समोरील आलिशान एरियात टू बीएचके लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला. इतकच नाही तर त्याने परदेशातही जाऊन मौजमस्ती केली. मात्र हे प्रकरण उघड होताच त्याचे आई-वडील आणि स्वतःआरोपी फरार होता. अखेर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.