आंतरराष्ट्रीय
दक्षिण कोरियात विमानाला भीषण अपघात, १७९ जणांचा मृत्यू...!

पक्षाने धडक दिल्यामुळे दुर्घटना घडली, प्राथमिक अंदाज.

सेउल: दक्षिण कोरिया मधील सेउल ‘जेजू एअर’ बोईंग – ७३७-८०० जेट च्या एका प्रवासी विमानाला अपघात झाला आहे .पक्षाने धडक दिल्याचे प्राथमिक अंदाज, त्यामुळे विमानातील लँडिंग गिअर मध्ये बिघाड झाला. विमानाला तात्काळ आपत्कालीन लँडिंग करावी लागली. लँडिंग करताना धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर ते वेगाने कुंपणाच्या भिंतीवर जाऊन धडकले. विमान भिंतीला धडकताच विमानाला प्रचंड आग लागली.या भीषण आगीत १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात ८५ महिला व ८४ पुरुषांचा समावेश आहे. अन्य दहा जणांची ओळख अद्यापही पटू शकली नाही. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. त्यात दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स व कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरच्या माध्यमातून अपघाताची कारणे शोधली जात आहेत.