कोनेरू हम्पी जागतिक रॅपिड चेस चॅम्पियन २०२४
कोनेरू हम्पीने दुसऱ्यांदा पटकावले महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप २०२४


न्यूयॉर्क: कोनेरू हम्पीने दुसऱ्यांदा पटकावले महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप २०२४
भारतीय महिला कोनेरू हम्पी हिने रविवारी हिंदू इंडोनेशियाच्या झरीन सुकंदर हिला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. यापूर्वीही हम्पीने 2019 मध्ये जॉर्जिया येथे ही कामगिरी बजावली होती. हम्पीने चीनच्या वेनजून हिच्यानंतर या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी दुसरी खेळाडू बनली आहे. तिने असे म्हटले आहे की इतक्या लहान वयात ग्रँडमास्टर झाल्याने ” माझ्यावर अपेक्षाच ओझं होतं माझी कारकीर्द कधी स्थिर नव्हती मी अनेक चढउतार पाहिले. मी मुलगी असल्यामुळे असंही विचारण्यात आलं की माझ्यात खरंच कुवत आहे का ग्रँडमास्टर होण्याची “?तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महिला खेळाडूंसमोरील भावना विषयी सांगितले होते. ” ग्रँड मास्तर चा किताब मिळवणं खूप कठीण असतं, पण त्याहून कठीण असतं खेळाचा तो दर्जा कायम राखणं.” मी सहा वर्षाची असताना खेळायला सुरुवात केली. माझे वडीलही बुद्धिबळ खेळायचे त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून माझं प्रशिक्षण सुरू केलं. त्यांनीच ठरवलं होतं मला चॅम्पियन बनवायचं. त्यामुळेच माझं नाव त्यांनी “चॅम्पियन” या शब्दावरून “हम्पी” ठेवलं. ” मी खूप आनंदी आणि उत्साहीत आहे मला माहिती होते की एखाद्या ट्राय ब्रेक सारखा हा खूप कठीण दिवस असेल “.हम्पी म्हणाली की मी वर्षभर संघर्ष करत होते आणि अनेक स्पर्धांमधून मी शेवटचे स्थान मिळवले त्यामध्ये अतिशय खराब कामगिरी केली होती. हम तिने या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे ती म्हणाली की मला वाटते की माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले माझे पती आणि आई-वडील यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला जेव्हा मी स्पर्धेसाठी बाहेर देशात जाते तेव्हा माझे आई-वडील माझ्या मुलीचा सांभाळ करत असतात 37 व्या वर्षी जगज्जेते पटकावने सोपे नाही.जग जसे जसे तुमचे वय वाढते तसे ती प्रेरणा टेकून ठेवणे आणि आवश्यकतेनुसार तंदूरस राहणे अधिक कठीण होते मी हे करू शकले याचा मला आनंद आहे.