अहो शेठ लय दिसांनी झालीया भेट ; ठसकेबाज लावणीवर थिरकली तरुणाई..!

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केंद्रीय युवा महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस स्टेज क्रं.१ सृजनरंग मंच्यावर लावणी कलाप्रकार जल्लोषात सुरु झालाय,कोड क्र. 70 मिलिंद कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील मनीषा इंगळे विद्यार्थिनीने “हिऱ्याची अंगठी रुतून बसली…अहो शेठ लय दिसांनी झालीया भेट” ही लावणी सादर केली, लावणीच्या अदाकारीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली या लावणीला शिट्या,टाळ्याच्या गजरात प्रतिसाद मिळाला.रसिकानी ही लावणी एन्जॉय केली. मिलिंद कला महाविद्यालयाचे संघ प्रमुख डॉ.अभिमन्यू गवई सर आणि डॉ.संगीता दोंदे मॅडम यांच्याकडे युवा महोत्सवामध्ये संघप्रमुख म्हणून जबाबदारी होती.
कोडं क्रं. १०४ राजे शहाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी संध्या जाधव हिने “प्रीतीच्या झुल्यात झुलावा” ही लावणी सादर केली.संघ प्रमुख डॉ. सुभाष वाघ, प्रा. दापके मॅडम उपस्थित होत्या. कोडं क्रं. २२ ने चला जेजुरीला जाऊ ही ठसकेबाज लावणी सादर केली, प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली.
कोडं क्रं. २९१ “सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत” या विद्यार्थिनीने लावणी करतांना प्रेक्षकांच्या मनात भुरळ घातली. लावणीच्या प्रत्येक अदाकारीवर रसिक शिट्या वाजवत होते. आणि लावणीला प्रोत्साहन देते होते.
युवा महोत्सव कलावंत घडवण्याचे व्यासपीठ
युवा महोत्सव कलावंत घडवण्याचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळते,गेल्या कित्येक दिवसापासून मी लावणीची प्रॅक्टिस करत होते.आज मी लावणी सादर केली खूप छान वाटतंय रसिक प्रेक्षकाकडून प्रतिसाद चांगला मिळाला आहे.
विद्यार्थिनी : मनीषा इंगळे
मिलिंद कला महाविद्यालय