
बीड : मस्साजोग घटनेवरून छत्रपती संभाजी राजे आक्रमक केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली आहे. पण अद्यापही काही आरोपी फरार आहेत त्यामुळे या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. असून यामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे देखील सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी होताना यावेळी छत्रपती संभाजी राजेंनी प्रतिक्रिया दिली त्यांनी संतप्त सवाल उपस्थित आहेत. ते म्हणाले की ” वाल्मीक कराडला संरक्षण देणाऱ्या तिथल्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही?” तसेच ” मंत्रिमंडळातून हाकालपट्टी का झाली नाही ?” तसेच “आरोपीला पोलीस का पडू शकत नाहीत ?”असे अनेक प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केले आहेत.
