जितेंद्र आव्हाड यांच हातात बेड्या घालून विधिमंडळात आंदोलन..!
"राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत"

द फ्रेम न्यूज
मुंबई : महाराष्ट्रात माहितीचा नवा सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात वेगवेगळे मुद्दे चर्चेस पाहायला मिळाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून विधान भवनात प्रवेश केला. राज्यात विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांची पाठवणी करताना होणाऱ्या अपमानाच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं ते म्हणाले. ते म्हणाले की “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो काही घाला घातला जातोय,ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्याकार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे. आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होत आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्यां आहेत.” या बेड्या या करीत सुद्धा आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आपले धोरण अनेक भारतीयांचे घरसंसार उध्वस्त करणारे आहेत .म्हणजे ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून कोंबून भारत पाठवलं म्हणजे काय पायात साखळ दंड, हातात हातकड्या, शौचालयाला जागा नाही. भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा, अपमानित करणारा आहे.याच्यात कुठल्याही एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण अडकले पोर अमेरिकेत राहतील मुंबई महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठ्या होण्याचे स्वप्न बघणाऱ्या महाराज मराठी माणसांचे उध्वस्त होताना दिसतायेत जर या बेढ्यान विरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसून तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतात या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. एक तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर करणार का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका, अमेरिका आपली बाप नाही” असे उद्विग्न होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या घालून विधिमंडळात आंदोलन केलं.