आज भारत आणि न्यूझीलंड येणार आमने सामने.!
. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

द फ्रेम न्यूज नेटवर्क
दुबई : यूएई आणि पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज २ मार्च रविवार रोजी भारतीय संघ आणि न्युझीलँड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच चॅम्पियन ट्रॉफी च्या अ गटातील हा शेवटचा सामना असेल. उपांत्य फेरीमध्ये हे दोन्हीही संघ पोहोचले आहेत. तरी आजच्या सामन्या वर निर्णय होईल जो संघ आजचा सामना जिंकेल तो संघ पहिला उपांत्य फेरी सामना खेळणार आहे. त्यामुळे दोन्हीही संघ आपापल्या पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत.
दोन्ही संघ सर्वात उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील तसेच न्यूझीलंड सारख्या संघावर मात करण्यासाठी भारतीय संघाला सर्वोत्तम खेळ खेळावा लागणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी पटूंची भूमिका निर्णायक ठरणार आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर एक आठवड्याच्या विश्रांती विश्रांतीनंतर आज भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे.