मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लोटला भीमसागर
राज्यभरातून भीमसागर उसळला, समता सैनिक दलाकडून बाबासाहेबांना सलामी देण्यात आली

छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन निमित्त विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वार परिसरात अभिवादनासाठी शहर आणि राज्यातून अनुयायी आले होते. नामांतर विस्ताराचा लढा हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रखर संघर्षाच्या आठवणींना उजळ देत विद्यापीठ गेटवर १४ जानेवारी रोजी राज्यभरातून भीमसागर उसळला,समता सैनिक दलाकडून बाबासाहेबांना सलामी देण्यात आली. विद्यापीठ गेटवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता साठी सकाळपासूनच भीम आणि हातामध्ये पुष्पहार घेउन रांगेत दिसले ही गर्दी संयम काळपर्यंत प्रचंड वाढली सकाळी समता सैनिक दलाने बाबासाहेबांना खडी सलामी दिली विविध पक्ष संस्था संघटनांचे पदाधिकारी नेते उत्साहात अभिवादन करीत होते. या ठिकाणी दिवसभर जाहीर सभा झाल्या.बाबासाहेबांवर लिखित पुस्तके आणि भगवान बुद्धांच्या मूर्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो, पुस्तकांचे शेकडो दुकाने ठिकठिकाणी उभारण्यात आले होते. बुद्ध आणि भीम गीतांच्या जयघोषाने विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता.