आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात लेखिका किशोरी पाटील यांचा गौरव
आयोजक विजय वडवेराव यांनी प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन किशोरी पाटील यांचा गौरव केला आहे

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात मुक्त लेखिका कवयित्री किशोरी पाटील यांचा गौरव करण्यात आला. पुणे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव कार्यक्रमात आयोजक विजय वडवेवार यांच्या हस्ते किशोरी पाटील यांचा गौरव करण्यात आला. सन्मानाचे स्वरूप प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन सन्मानित केले.
प्रवासवर्णन विविध साहित्यावर किशोरी पाटील यांची विशेष लेखमाला प्रिंट माध्यमावर सुरु आहे. आठ महिन्यात त्यांचे पन्नास आर्टिकल प्रकाशित झाले. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असल्याने त्यांचा सन्मान होत आहे. कवयित्री म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. साहित्यसंमेलन,कविसंमेलनामध्ये सहभाग घेत कमी कालावधीत त्यांनी साहित्यक्षेत्रात ठसा उमटविला. पुणे येथे आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवात किशोरी पाटील यांनी सावित्रीबाई फुलेची वेषभूषा साकारून कवितांचे सादरीकरण केले.आयोजक विजय वडवेराव यांनी प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन किशोरी पाटील यांचा गौरव केला आहे.
जानेवारी २०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती पुणे येथे एस एम सभागृह आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव विजय वडवेराव अतिशय सुंदर भव्य दिव्य सोहळा शेकडो सावित्रीबाई नऊवारी ईरकल कपाळावर आडवी कुंकवाची चिरी लेवून, हाती पुस्तक आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचा जागर असे उत्साहवर्धक वातावरण होते. आयोजक महात्मा फुले यांच्या वेषात आल्यावर अजूनच जल्लोष वाढला. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातीमा शेख, महात्मा फुले यांच्या वेशभूषेत काव्य सादरीकरण केले सावित्री-ज्योती याचे आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात कार्यक्रमाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. भिडेवाड्याचे स्मारक व्हावे, यासाठी विजय वडवेराव यांनी १२ वर्षे संघर्ष करत यश संपादन केले.