क्रीडाताज्या बातम्यामनोरंजनमुंबई
Trending
आली रे आली आयपीएल ची तारीख आली
येत्य२३ मार्च पासून आयपीएल चालू होईल


मुंबई : आली रे आली IPL २०२५ ची तारीख आली, ‘या’ दिवसापासून पहायला मिळणार थरार,नवर्षाच्या सुरुवातीनंतर क्रिकेटप्रेमींना आता आयपीएलच्या आगामी पर्वाची उत्सुकता लागली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या वर्षाचा आयपीएल नेमका कधीपासून चालू होणार? हे विचारले जात होते. असे असतानाच आता आयपीएल २०२५ च्या पहिल्या समान्याची तारीख समोर आली आहे.

आज बीसीसीआयच्या सचिवपदी माजी क्रिकेटरदेवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी प्रभजीत सिंग भाटीया यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएल २०२५ विषयी महत्त्वाची माहिती दिली. येत्या २३ मार्च पासून आयपीएल चालू होईल, असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.