अक्षयचा 'भूत बंगला ' येतोय
हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

मुंबई : होय बाॅलिवुड सुपरस्टार अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘भूत बंगला’असे आहे.या चित्रपटात अक्षयकुमार सोबत अभिनेत्री तब्बू सुद्धा आहे.हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. आणि त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत, जो अशा चित्रपटांकरीता ओळखला जातो.अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेवटी त्याच्याकडे असा चित्रपट आहे जो हिट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. चित्रपटाचं चित्रीकरण गेल्या आठवड्यात राजस्थानमधील जयपूर येथे सुरू झाले.भूत बांगला’चा समावेश होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा चित्रपट एकता आर कपूर आणि अक्षय कुमार यांच्या प्रोडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. या चित्रपटाची कथा आकाश ए कौशिक यांनी लिहिली आहे. हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.येत्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर किती यशस्वी होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.