छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रलेख

शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आशा डांगे यांची निवड करण्यात आली आहे

द फ्रेम न्यूज

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथील (शिक्षण विभाग) आयोजित दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. असे अश्विनी लाटकर-पानसरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक कवी कलावंत शिक्षक आहेत असे भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक अत्यंत मोलाचे योगदान देत असतात. या शिक्षकांच्या साहित्य प्रतिमेला आणि केलेला अधिक जावा मेळावा लिहिता हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर शिक्षणाधिकारी योजना अरुणा भूमकर प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आम्लभाषेच्या संचालक डॉक्टर राठोड डायटच्या प्राचार्य देशमुख डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे आणि पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हबीब भंडारे या सात सदस्य निवड समितीने यंदाच्या दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड केली आहे.छत्रपती संभाजी नगर येथील बळीराम पाटील विद्यालयात आशा डांगे येथे गेल्या २७ वर्षापासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्या  शिक्षणशास्त्रात पीएचडी करत आहेत. त्या बालभारती पुणे यांच्या कार्यानुभव व मराठी विषयाच्या पुस्तकाच्या समीक्षा समितीत कार्यरत होत्या अनेक शिक्षण प्रशिक्षणात तज्ञ म्हणून मार्गदर्शक त्यांनी काम केले आहे त्यांचे परिघाबाहेर आणि प्रिय हा कण गोड पार्टिकल आहे हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल अनेक मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार आजपर्यंत त्यांना मिळालेले आहेत. आशा डांगे यांची निवड झाल्याबद्दल वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड उपाध्यक्ष अभय राठोड सचिन नितीन राठोड कोषाध्यक्ष डॉक्टर बीपी राठोड कार्यकारणी सदस्य माधुरी राठोड रितू राठोड यांनी अभिनंदन केले आहे शिक्षक वर्ग आणि साहित्यिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button